Two expre ions by an inmate Shri Ganesh S ji before and after Geeta Cla es
कितीही चांगली असली तरी यायची येथे नाही कोणाची इच्छा येथूनच प्रारंभ करू नव्या आयुष्याचा
BEFORE
बंदी शाळा
शाळा भरली बंद्यांची इच्छा त्यांची नसताना
कोणी असतील अपराधी कोणी काही नसताना ||धृ||
येथे कोणी गरीब कोणी धनवान आहे
या येथे प्रत्येक जन बंदी हे प्रमाण आहे..
जपतात येथे सर्व आपापल्या भावना
कोणी करितो नमाज कोणी करे प्रार्थना ||१||
आहेत प्रत्येकांच्या ओठी आयुष्याच्या आठवणी
सांगतात एकमेकांना त्यांच्या नितळ आश्रृंनी
अश्रू येतात सर्वांनाच आठवण करत प्रत्येक क्षण
समजवतात ही एकमेकांना करून आपले मोठे मन||२||
आठवण येते प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची
म्हणूनच पाहतात वाट -पत्र मुलाखतीची
येथे प्रत्येकाला वाटे यावा माझा जामीन
यावर कोणी म्हणे तथास्तु कोणी म्हणे आमीन ||३||
येथेच शिकतील सारे विचार आणि आचरण
या सत्य संकल्पाचा दाता तूची नारायण
म्हणे ही जागा आहे सुधारणा आणि पुनर्वसनाची
येथूनच सुरुवात होईल वाल्याच्या वाल्मिकीची ||४||
हीच माझी इच्छा, हीच माझी इच्छा........
AFTER
गीतेची संथा
संसाराच्या दाहाने जेव्हा ठणकू लागेल माथा
आपल्याच कर्माने जेव्हा जीव होईल हा भीता
वाटेवर आयुष्याच्या कर्म वाटू लागेल हे वृथा
असेल गरज घेण्याची तेव्हा गीतेची ही संथा ||१||
अर्जुनापरि विषाद मनी होऊ लागेल हा जिता
कर्म अकर्म यांचाही मनी न उमजे गुंथा
योगी असावे की कर्मी यात गुंतू लागे माथा
असेल गरज घेण्याची तेव्हा गीतेची ही संथा ||२||
असे येथे जो तो कोणी जाणता वा नेणता
इच्छा असेल जाण्याची थोर मोक्षाचीया पंथा
भक्ती- ज्ञान- वैराग्य यांच्या धरूनिया हाता
त्याने गावी सुरातही गीतेची ही सुरेल संथा ||३||
जेव्हा उमजू लागली पुरुषोत्तमाची ही गीता
तेव्हा हरली संसाराची भव,भय आणि व्यथा
मोक्ष संन्यासाची ओढ लागली ये चित्ता
जेव्हा दिली गुरूंनीही आम्हा गीतेची ही संथा ||४||
सोसवेना जेव्हा आम्हा बंदीवासाची ही व्यथा
थोर उपकार तुमचे तुम्ही गुरू माता पिता
तुमच्या मुखातून लाभली आम्हा गीतेची ही संथा ||५||
तेव्हा झाला भाग्योदया आम्हा हाती आली गीता


