गीता चिन्तनिका
4, 5, 6वाँ अध्याय - 13 जुलाई 2023
प्रति-एकादशी श्रीमद्भगवद्गीता पारायण आणि चिंतन- कामदा एकादशी गुरुवार १३ जुलै २०२३ कामदा एकादशी गुरुवार १३ जुलै २०२३ या दिवशी अध्याय चार, पाच, आणि सहा यांचे पठण आणि चिंतन झाले. कार्यक्रमाची सुरुवात, "ईश्वर भक्तिभाव से बहती संस्कारों की धारा" या गीताने झाली. त्यानंतर हनुमान चालीसा पाठ आणि श्रीकृष्णाष्टक झाल्यानंतर, श्रीमती किरण अरोरा जी यांनी सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले श्रावण महिन्यातील पहिल्या एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. आपल्या हातून जाणता-अजाणता घडलेल्या पापांपासून या एकादशीच्या व्रतामुळे सुटका मिळते. कार्यक्रमांमध्ये यानंतर ओम प्रकाश जी. बडोदा गुजरात यांनी चतुर्थ अध्यायाचे पठण केले. लक्षी दीदी व्यास अहमदाबाद गुजरात यांनी पंचम अध्यायाचे पठण केले. षष्ठम अध्याय मेघा दीदी परळी वैजनाथ, व देवांश पुणे यांनी अनुक्रमे सादर केले. अत्यंत अस्खलितपणे सर्व साधकांनी अध्यायांचे पठण केले नंतर याच अध्यायांचे विवेचनही पार पडले. सर्वप्रथम श्रेष्ठ अशा चतुर्थ अध्यायाचे सुनंदाजी पुणे यांनी विवेचन केले.
पूज्य स्वामीजी गुरु गोविंद जी महाराज यांना प्रणाम करून त्यांनी सांगितले की भगवद्गीता ही जीवन गीता आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीस जीवन जगण्याचा आदर्श मार्ग कसा असावा याचा उपदेश केला आहे. हे श्रीकृष्णाने प्रथम सूर्याला सांगितले होते. काळाच्या ओघात ही परंपरा लुप्त झाली म्हणून श्रीकृष्णांनी ते ज्ञान पुन्हा अर्जुनाला सांगितले व त्याला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. साधारण कर्म व नियत कर्म, धर्माधिष्ठित कर्म, योग, यज्ञ, आणि ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहेत. शांती व समाधान, ज्ञानींना शरण जाणे, नम्रतेने वागणे, इंद्रिय मन बुद्धी यांचा निग्रह, हे सुद्धा यज्ञ आहेत, योग, तप, स्वाध्याय यांनाही यज्ञच म्हटलेले आहे, आणि हा यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे, परमात्म्याची प्रचिती व प्राप्ती योगानेच होते आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तत्त्ववेत्ते, ज्ञानी, साधुसंत यांना शरण जाणे हेच मानवी जीवनाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्याय पाचवा - लक्षी दीदी नागपूर, कर्म संन्यास योग नावाच्या सहाव्या अध्यायाबद्दल बोलताना म्हणाल्या, मानवी जन्मात येऊन मन व इंद्रिये नियंत्रित करणे गरजेचे आहे. याशिवाय योगप्राप्ती शक्य नाही. कर्म संन्यास व कर्मयोग दोन्ही कल्याण कारक आहेत. परंतु हे अर्जुना तुझ्यासाठी कर्मयोग श्रेयस्कर आहे आणि म्हणून तोच मी तुला सांगतो, कारण तू गृहस्थाश्रमी आहेस व गृहस्थाने भगवद्गीता समजणे व आचरण करण्यासाठी संन्यास घेण्याची आवश्यकता नाही, म्हणून सरळ सोपा कर्म मार्ग मी तुला सांगतो. अर्जुना आपण केलेले प्रत्येक कर्म त्याच्या फळाची आशा न धरता मला अर्पण कर, म्हणजेच श्रीकृष्ण
परमात्म्याला अर्पण कर, जसे की पाण्यात असून सुद्धा कमळाला चिखल लागत नाही, त्याप्रमाणे मला कर्म अर्पण करण्याने साधकाला त्याचा दोष लागत नाही, मनुष्याने साधना केली पाहिजे त्यामुळे अंतकरण पवित्र बनते, परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठीची पात्रता येते, स्वशुद्धी होते, आणि म्हणूनच मन व बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी असली पाहिजे. यानंतर सहाव्या अध्यायासाठी कृतीजी वंदन लखनऊ यांनी मार्गदर्शन केले. आत्मसंन्यास योग नावाच्या श्रेष्ठ अध्यायाबद्दल बोलताना कृतीजी म्हणाले- जोपर्यंत इंद्रियांवर आपण ताबा मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला योगाभ्यास प्राप्त करणे शक्य नाही. आपण आपल्या अपयशाचे कारण नेहमी दुसऱ्या व्यक्तीला समजतो परंतु भगवान सांगतात की आपण स्वतःच आपल्या यश किंवा अपयशासाठी कारणीभूत असतो. मन व इंद्रिये यांच्या संयमाने आपणच आपले कल्याण करू शकतो. सर्वाभूती समानता त्याच्या ठाई असते, मित्र, शत्रू, साधू, चोर, यांना तो एकाच दृष्टीने पाहतो, की ते सर्वप्रथम जीव आहेत मनुष्य आहेत. अशा प्रकारे मन इंद्रियांना वश करणारा साधक परमशांती प्राप्त करतो.समापन प्रार्थना सोहम भैया यांनी केली व हनुमान चालीसा पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Other Sessions-
गीता चिन्तनिका सत्र - 7, 8, 9वाँ अध्याय - 29th July 23
https://www.youtube.com/live/QX6rOCfkEZE?si=cj86gy5GINGAWha1
गीता चिन्तनिका सत्र - 13, 14, 15वाँ अध्याय - 23rd Nov 23
https://www.youtube.com/live/dbaKJd1rsIw?si=HeT17NKTv5PUQvkO
गीता चिन्तनिका सत्र - 16, 17, 18 वाँ अध्याय - 9th Dec 23
https://www.youtube.com/live/CXiooPFuf_g?si=6dVISMRG9FfnDgy5

