मुख्य सामग्री पर जाएँ
गीता मैत्री अंक ७जनवरी से जून २०२४
०६आओ गीता सेवी बनें

आओ गीता सेवी बनें

'स्वयंसेवक होऊनी मानवतेची सेवा करू! दैवीय संधी आली दारी भगवंताचे स्वागत करू!!'

आओ गीता सेवी बनें

Be a Geeta Volunteer

28/01/24

YouTube ↗

मराठी

दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी गीता परिवाराने “चला गीता सेवी बनू या” या वेबिनार चे आयोजन केले होते. या मध्ये गीता परिवारातील विविध प्रकारच्या सेवांचा परिचय करुन देण्यात आला.

1. कॉलिंग सेवा: ही सेवा नवागत साधकांचे गीता परिवारात फोन करून स्वागत करते. या सेवेसाठी एका दिवसात किमान वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. गीता संथा वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी आणि साधकांना वर्गात उपस्थित राहण्यासाठी नवी ऊर्जा मिळते.

2. तांत्रिक सहाय्यक आणि दळणवळण सेवा(टेक्निकल असिस्टंट): या सेवेसाठी इच्छुक सेविना आधी मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. SMS प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेण्यात येतात. संथा वर्गात प्रशिक्षकांना स्पॉट लाईट करावे

लागते. साधकांना mute/unmute करून स्क्रीन शेअरिंग केले जाते. व्हॉट्स ॲप समूहात नियोजित वेळेत दोनदा झूम लिंक पोस्ट करावी लागते आणि श्लोकांचे ऑडिओ क्लिप्स, अर्थांचे इमेजेस, श्लोक पोस्ट करणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

3. समूह संचालक: पडद्या मागे राहून समूह संचालक प्रशिक्षक, तंत्र सहाय्यक आणि गीता परिवारा चा दुवा असतो. व्हॉट्स ॲप समूहावर लक्ष ठेवून वेळेत संथा वर्गाची लिंक पोस्ट केली जाते का नाही, संबंधित अध्यायाचे साहित्य शेअर केले जाते का नाही याची नोंद घेण्याची ही सेवा आहे. “जिथे कमी तिथे मी” या उक्तीनुसार समूह संचालका ला तत्पर रहावे लागते. अडीअडचणी च्या वेळी झूम वर्ग सुरू करणे, तांत्रिक सेवा देणे,साहित्य,लिंक शेअर करणे या सेवा देण्यासाठी तयार राहावे लागते. प्रशिक्षक,तंत्र सहायक यांची सुट्टी असेल तर बदली सेवा उपलब्ध करून द्यावी लागते. दररोज झूम वर्गात किमान दहा मिनिटे उपस्थित रहावे लागते. याचे नेमून दिलेल्या संथा वर्गावर नियंत्रण असते. या सेवेसाठी किमान वय पंचवीस वर्षाचे असावे.

4. प्रवेश विभाग: या विभागात नोंदणी केलेल्या साधकांना त्यांनी निवडलेल्या वेळेत प्रवेश दिला जातो.या सेवीना दोन उपविभागात कार्य करावे लागते. प्रवेश देणे आणि संपर्क साधणे. या साठी उपयुक्त कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.सेवी ला स्मार्ट फोन चे ज्ञान असावे लागते. किमान वय सोळा वर्षे.

5. सृजनात्मक लेखन विभाग: या विभागात दर शनिवारी आणि रविवारी जे विवेचन सत्र होतात ती ऐकून त्यांचा सारांश साधकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पक भाषेत लिखाण करावे लागते. हे लिखाण वेगवेगळ्या भाषेत असते.या साठी साप्ताहिक सुट्टीचा दिवस नेमून दिला जातो.

6. ग्राफिक डिझायनिंग आणि ॲनिमेशन विभाग: गीता परिवाराकडून साप्ताहिक विवेचन सत्र, अन्य काही ऑफलाईन कार्यक्रम आयोजित केले जातात.त्या साठी विशिष्ट ॲप मधून हक सूचना, ग्राफिक्स तयार करावे लागतात.सोशल मीडिया वर पोस्ट करावे लागतात. नवीन सेवी ना ही कला शिकण्यासाठी सहाय्य केले जाते. श्लोकांचा अर्थ दाखविणारे JPEG इमेज तयार करावे लागतात. या साठी ग्राफिक डिझायनिंग चे कौशल्य असणे आवश्यक आहे.

7. माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट वेअर विभाग: लर्न गीता च्या यशस्वी वाटचालीत या विभागाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ही वेबसाईट सहजतेने सर्वांना

उपलब्ध होण्यासाठी हा विभाग कार्यरत असतो. या साठी संकेतांकनिर्माण करणे, नवीन डिजिटल पानांची निर्मिती, डाटा बेस तयार करणे, नवीन ॲप्स बनविणे या सेवा देण्यासाठी हा विभाग तत्पर असतो.

8. ऑफलाईन स्टोअर विभाग: भगवद्गीतेतील विचार आणि शिकवण देश विदेशातील साधकांपर्यंत जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतून संबंधित साहित्य, पुस्तके ऑनलाईन शिवाय ठीक ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध करून दिले आहेत.त्या साठी विविध शहरात ही ऑफलाईन स्टोअर्स उपलब्ध आहेत. आपण रहातो त्या ठिकाणच्या जवळ असलेल्या स्टोअर्स शी संपर्क साधून पुस्तके किंवा गीता परिवारातील इतर साहित्य विकत घेता येते. या माध्यमातून गीता परिवार

समाजाशी जोडला गेला आहे.

9. बाल सखा विभाग: सोळा वर्षा खालील मुलांना गीता परिवारात सहभागी करून घेण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.मुलांना भगवद्गीता शिकण्यासंबंधी प्रेरित करणे,प्रसार आणि प्रचार करणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.

10. गीता प्रचारक विभाग: या विभागाद्वारे समाजाशी गीता परिवार जोडला गेला आहे.बॅनर्स, पत्रके, इतर

प्रसारक साहित्य सोशल मिडियावर पोस्ट करणे, ऑफलाईन कार्यक्रमात जन जागृती करण्यासाठी वाटप करणे हे याचे ध्येय आहे.

11. प्रशिक्षक विभाग: गीता संथा वर्गात भगवद्गीता शिकविण्यासाठी मुख्य प्रशिक्षक हवा. या साठी स्पष्ट उच्चार, उत्तम आवाज,व्याकरणाचे ज्ञान आणि शिकविण्याचे कौशल्य असावे लागते. प्रशिक्षकासाठी नोंदणी केल्यानंतर निवड प्रक्रियेचे काही निकष असतात त्या द्वारे प्रशिक्षणाची निवड केली जाते, योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर सुरुवातीला इंटर्नल ट्रेनर म्हणून अनुभवी प्रशिक्षाकडून मार्गदर्शन घ्यावे लागते.सगळ्या पायऱ्या पार केल्यानंतर ही सेवा मिळते.

या सेवां व्यतिरीक्त अन्य काही सेवा आहेत. जसे ऑनलाईन कार्यक्रमांचे सूत्र संचलन. आपल्या आवडी नुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण सेवा देऊ शकतो.

चला तर मग “सेवाभाव मनी ठेवूनी, भगवंत चरणी लीन होऊ या” भगवान श्रीकृष्णा चा भक्तिभाव अंतःकरणी विराजमान करण्यासाठी गीता सेवी बनू या.

मूल अंक के पृष्ठ देखें ३ पृष्ठ
मूल अंक, पृष्ठ २८मूल अंक, पृष्ठ २९मूल अंक, पृष्ठ ३०