
गीता चिन्तनिका (10, 11, 12वाँ अध्याय)
शेट्टीला एकादशी चे औचित्य साधून या विवेचन सत्रात भगवद्गीतेतील दहावा, अकरावा आणि बाराव्या अध्यायावर चिंतन झाले.
गीता चिन्तनिका
10, 11, 12वाँ अध्याय
06/02/24
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन किरण जी मुंदडा यांनी केले. सुरुवातीला त्यांनी गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य स्वामीजी श्री गोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या जन्मदिनी अमृत महोत्सवाचे आयोजन तीर्थ क्षेत्र आळंदी येथे होणार असल्याचा उल्लेख केला.त्यांच्या परम पवित्र चरणकमलाला साष्टांग वंदन करून आशीर्वाद देऊन या सत्राची सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘घरोघरी गीता प्रत्येकाच्या हाती गीता’
असा संदेश देणारे आदरणीय पूज्य स्वामीजी यांच्या मुळे आपल्या हातून भगवान श्रीकृष्णाची सेवा घडण्याची ही संधी आपल्याला प्राप्त होत आहे. त्यांना कोटी कोटी वंदन.असा त्यांचा आशीर्वाद मागून कमलेश जी मित्तल दीदी ने आरंभ प्रार्थना घेतली.पुन्हा एकदा आळंदीच्या कार्यक्रमाची उद्घोषणा झाली. त्या नंतर दीप प्रज्ज्वलन डिम्पल जी रूपेरिया यांनी केले. गीता परिवाराचे मेरुमणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय जी मालपाणी आणि अन्तरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. आशू जी गोयल यांच्या संदेशाचा उल्लेख केला गेला. हा जगन्नाथाचा रथ पुढे
नेण्यासाठी हे दोघे सारथी आहेत. दोन आधारस्तंभ आहेत.
प्रमुख कार्यक्रम पुढे नेत असताना किरणजी मुंदडा यांनी अध्याय दहावा, अकरावा आणि बारावा यांचे पठण करणाऱ्या गीताव्रती
रिचा जी पटेल,अहमदाबाद. जी बारा वर्षाची
बालिका आहे रूपा जी झरिया बँकॉक येथे राहणाऱ्या आणि सरस्वती मुंदडा जयपूर मध्ये वास्तव्य असलेल्या यांचा परिचय करून दिला.
10व्या अध्याया चे सारांशपर प्रस्तुतिकरण जबलपूर च्या निलिमाजी चिंचोलकर यांनी केले. दहावा अध्याय म्हणजे विभूती योग. नवव्या अध्यायातिल गोपनीय रहस्याचे दर्शन घडविल्या नंतर दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुना ला त्याच्या हिताच्या गोष्टी समजावून सांगितल्या.
श्लोक 1 ते 7 : या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी स्वतः च्या अस्तित्वाचे विश्लेषण केले आहे. भगवान म्हणतात, त्यांची उत्पत्ती ना देव जाणतात ना महर्षी. कारण श्रीकृष्ण म्हणजे सगळ्यांचे मूळ रूप. आदि स्वरूप.
जो भगवंता चे स्वरूप जाणतो तो मनुष्य ज्ञानी आहे सर्व पापांपासून तो मुक्त होतो.
अशी व्यक्ती भगवंता च्या ईश्वरी विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वत: जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही.
इथे भगवंत सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहेत आणि त्यांच्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेला बुद्धिमान भक्त या परमेश्वराला नेहमी भजतात.
निरंतर त्याच्यात मग्न असतात. आणि स्वतः चे प्राण अर्पण करतात असे हे भक्तजन भक्तीच्या चर्चेने परस्परांत भगवंताच्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे किर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि त्या ईश्वरी रुपात नेहमी रममाण होत असतात.
असे ध्यानात मग्न झालेले भक्तांना प्रेमाने न्हाऊन निघालेल्या भक्तांना तो तत्वज्ञानरूप योग देतो. ज्यामुळे ते पुन्हा भगवंताला प्राप्त होतात.भगवंत अर्जुनाला म्हणतात,
“हे अर्जुना! त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूप दिव्याने मी नाहीसा करतो.”
श्लोक क्रमांक 8 ते 1 1 ला चतुश्लोकी गीता म्हणतात.संसाराचे मूळ मी आहे नित्य निरंतर माझे स्मरण करतात माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर माझी कृपादृष्टी असते.त्यांचे अज्ञान मी दूर करतो. सगळ्या प्राण्यांचे मूळ बीज मी आहे.या संसारात मी आहे.त्यांना मी बुध्दीयोग देतो ज्यां मुळे माझी प्राप्ती होईल.
अर्जुन म्हणाला, “आपण परम ब्रह्म परम धाम आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य पुरुष, तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, अमित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता.
म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात.
हे योगेश्वरा! तुझे अखंड चिंतन करण्याकरिता मी तुला कोठे कोठे जाणावे व कोणकोणत्या पदार्थांच्या ठिकाणी माझ्याकडून तुझे चिंतन होण्यासारखे आहे?
हे जनार्दना! आपले योगसामर्थ्य म्हणजे बहुरूप होण्याचे सामर्थ्य व विभूती यांचे विस्ताराने वर्णन करून पुन्हा सांगा. तुमच्या वचनामृताचे कितीही श्रवण केले तरी माझी तृप्ती होत नाही. ज्या ज्या भावाचे ठिकाणी तुझे चिंतन करणे मला सोपे जाईल तो तो आपला योग मला स्पष्ट करून सांगा.”
या वर भगवंत उत्तर देतात,
“हे निद्रेवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना! मीच सर्वांचा आत्मा असून सर्व भूतांच्या हृदयात आहे म्हणून सर्व भूतांचा आदी, मध्य व अंत मीच आहे.
आदित्यांत मी विष्णू असून प्रकाशवंतात मी किरणवान सूर्य आहे, आकाशमंडळातील नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे
वेदांमध्ये मी सामवेद असून देवांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मी मन असून प्राण्यांमध्ये मी चैतन्य आहे.
यापूर्वी भगवंतांनी "बारा आदित्यांमधील विष्णु मी आहे" असे सांगितले होते आणि आता इथे "अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे विष्णू मीच आहे" असे ते म्हणतात. इथे शैव-वैष्णव वाद संपतो.
भगवंत म्हणतात अग्नी मी पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे.
घोड्यांमध्ये श्रेष्ठ, अमृताबरोबर समुद्रातून प्रकट झालेला उच्चैःश्रवा नामक घोडा, श्रेष्ठ हत्ती ऐरावत ही भगवंतांची विभूती आहेत.

नागांमध्ये शेषनाग मीच आहे.
मी दैत्यांमध्ये प्रह्लाद आणि गणना करणा-यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्षांमध्ये गरुड आहे.
मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधा- यांत श्रीराम आहे. तसेच जलचरातील मगर आहे आणि नद्यां माधिल गंगा आहे.
श्री भगवान म्हणतात- हे अर्जुन ! सृष्टीचा आरंभ, अंत आणि मध्यही मीच आहे. शास्त्रांमध्ये मी ब्रह्मविद्या आणि आध्यात्मिक विद्या आहे. जे आपापसात वाद घालतात त्यांच्यासाठी मी तत्त्व आहे.
मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वन्द्व आहे.अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरूप सर्वाचे धारण-पोषण करणाराही मीच आहे.
स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृति, मेधा, धृति आणि क्षमा मी आहे.
तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतुंतील वसंत मी आहे.
छळ, कपटामधील द्यूत मी आहे. प्रभावशाली पुरुषांचे तेज मी आहे. निश्चयी लोकांचा निश्चय तर सात्त्विक पुरुषांचा भाव मी आहे" असे भगवंत सांगतात.
गुप्तता बाळगण्याच्या कामी लागणारे मौन मी आहे" असे भगवंत सांगतात. ज्ञानमार्गात तत्त्वज्ञान मी आहे.
भगवंतांनी इथवर अर्जुनाला ब्याऐंशी विभूती सांगितल्या. ते पुढे म्हणतात, "अर्जुना, माझ्या विभूती अनंत आहेत पण तुझ्यासाठी मी संक्षिप्त रूपात सांगितल्या आहेत."
भगवंत म्हणतात, “सर्वांभूती, कणाकणांत त्यांचे अस्तित्व आहे. पण समजण्यास सोपे म्हणजे, जिथे जिथे ऐश्वर्य, कांती, शक्तीचा अनुभव येईल ती माझीच विभूती जाणावी.”
हे अर्जुना! त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो.
सर्वस्वी माझ्या ठिकाणी अनन्य झालेल्या भक्तांवर कृपा करण्याकरता त्यांच्या अंतःकरणात राहूनच त्यांचा अविवेकरुपी अंध: कार मी आपल्या प्रकाशमान ज्ञानदीपाने नाहीसा करतो.
हे महाबाहो, तत्व माझ्या प्रगट होण्याचे कारण कुणी देवता महर्षी जाणत नाहीत.मी त्यांचा पूर्वज आहे. जो मनुष्य माझी रूपे ओळखतो तो पापांतून मुक्त होतो. आणि अविचल भक्तीने युक्त होतो.
11 वा अध्याय गीताव्रती क्षमाजी गोखले:
अर्जुन म्हणतो, हे परमेश्वर ,मला तुमच्या अविनाशी रूपाचे दर्शन करायचे आहे.
आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा! आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे.
या वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रूपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार.
म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची! तू फक्त निमित्तमात्रच हो.
हे संपूर्ण विश्वाचे स्वामी! मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनन्त रूपे असलेले पाहात आहे. हे विश्वरूपा! मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरम्भ.
मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहात आहे.
अनन्त बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे, असे आहात, असे मला दिसते.
हे महात्मन्! हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत.
तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय 'सर्वांचे कल्याण होवो' अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत.
अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसू, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्विनीकुमार, मरुद्गण
आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत. ते सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहात आहेत.
हे महाबाहो! आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ ह होत आहे. आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे.
श्रीभगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रूपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार.
म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची! तू फक्त निमित्तमात्रच हो.
अर्जुन म्हणाला, हे अन्तर्यामी! आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय.
12 वा अध्याय मधुराजी वैद्य भक्तीयोग:
या अध्यायात भक्त कुणाला म्हणायचे? खरी भक्ती कशी असते? अभ्यासातून ती कशी प्राप्त केली जाते? हे सांगितले आहे पहिल्या श्लोकात अर्जुन भगवंताला विचारतात सगुण आणि निर्गुण भक्तीत श्रेष्ठ कोण? यावर भगवंत म्हणतात जे माझ्यात मन स्थिर करतात,ते माझे भक्त.अर्जुना,तू माझ्या साठी कर्म कर. फळाची अपेक्षा ठेवू नकोस.त्या साठी अभ्यास योग जाणून घे. जे काही तू करशील ते तू मला अर्पण कर.
अर्जुन भगवंताला विचारतो,तुम्ही दोन प्रकारचे भक्त सांगितले आहेत.एक सगुण भक्ती करणारे दुसरी निर्गुण भक्तीचे उपासक. त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण आहेत?
श्रीभगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन-ध्यानांत रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रध्देने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति-उत्तम योगी वाटतात.
परन्तु जे पुरुष इन्द्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन- बुद्धिच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय, स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी सच्चिदानंदघन, ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणिमांत्राच्या कल्याणात


तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी शेवटी मलाच येऊन मिळतात.
अर्जुना, तू माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धि स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, तुझे मन भरकटणार नाही.
जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे अर्जुना! अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर.
जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही 'माझी प्राप्ती होणे' ही सिद्धी तू मिळवशील.
मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने परम शान्ती मिळते.
जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणार्यालाही अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धि मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.
ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.जो कुणाचा द्वेष करीत नाही, हर्ष, शोक, भय, राग, क्रोध यात समतोल बाळगतात ते मला प्रिय आहेत.
ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.
जो शत्रु-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते,
ज्याला निन्दा- स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धि असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो.
परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होउन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत.
आभार प्रदर्शन:
कमलजी कौशल यांनी हे विवेचन सत्र यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचा उल्लेख करून आभार प्रदर्शन केले.
शेवटी जयपूरवासी भावना शर्मा जी यांनी समापन प्रार्थना सादर केली.किरण जी मुंदडा यांनी हनुमान चालीसा च्या कोटी कोटी पठणाचा संकल्पा विषयी भाष्य केले आणि हनुमान चालीसा ने या विवेचन सत्राची सांगता झाली.








