मुख्य सामग्री पर जाएँ
गीता मैत्री अंक ७जनवरी से जून २०२४
गीता चिन्तनिका (13, 14, 15वाँ अध्याय)
०७गीता चिन्तनिका सत्र

गीता चिन्तनिका (13, 14, 15वाँ अध्याय)

जया एकादशी निमित्त चिंतनिका सत्रा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नेहमी प्रमाणे सुमधुर अशा गीता परिवाराचे वैशिष्ठ्य सांगणारे “गीता परिवार हमारा “ या प्रेरणागीताने झाली.या सत्राचे

गीता चिन्तनिका

13, 14, 15वाँ अध्याय
20/02/24

YouTube ↗

सूत्र संचालन बेंगलोर च्या मनीषा जी चावडा ताईने केले.

सूक्ष्म रुपात परम पूज्य स्वामी श्रीगोविन्दगिरिजी महाराज यांना साष्टांग वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

गीताव्रती अनिताजी यांनी आरंभ प्रार्थना म्हटली.तसेच

दिप प्रज्ज्वलन मुंबई च्या मुनिष अग्रवाल जी यांनी केले.या नंतर भगवद्गीतेत तेरावा चौदावा आणि पंधराव्या अध्ययचे क्रमवार पठाण करण्यात आले.तेराव्या अध्याय गुजराथ मधिल वडोदरा येथील गीताव्रती मीनल जी शहा यांनी प्रस्तुत केला.चौदावा अध्याय सोनाजी यांनी तर पंधरावा अध्याय नाशिक महाराष्ट्र येथील संध्याजी मुळे यांनी सादर केला.

गीता पठना नंतर या प्रस्तुत केलेल्या अध्यायांवर चिंतन करण्यात आले.

तेराव्या अध्याया वर बँकॉक थायलंड येथील गीताव्रती गीता सेवी रुपाजी झरिये यांनी विचार मंथन केले. त्यांनी काही श्लोकांची विभागणी केली.

हा अध्याय क्षेत्र ( क्षेत्र) आणि क्षेत्रज्ञ ( क्षेत्र जाणणारे) या दोन संज्ञांचा परिचय करून

देणारा आहे.तसेच 'क्षेत्र' बनवणाऱ्या घटकांचे आणि 'ज्ञाता'च्या गुणधर्मांचे वर्णन करणारा आहे.

क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि आत्मा हा या 'क्षेत्राचा ज्ञाता' मानला जातो.

क्षेत्रज्ञ (क्षेत्राचा जाणता) हा आत्मा किंवा स्वतः आहे आणि स्व आणि परम हे शेवटी एक आहे.

प्रकृती आणि शरीरापासून वेगळे असलेल्या आत्म्याचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान (निरपेक्ष ज्ञान). ज्ञानी (ज्ञानी व्यक्ती) स्वतःला समजून घेतो आणि सन्मार्गाचा अवलंब करतो.

भगवंतांनी ज्ञानी मनुष्याचे असे अनेक सद्गुण सांगितले आहेत. हे सद्गुण आपण आत्मसात करावे अशी त्यांची इच्छा आहे. जेणेकरून आपण सन्मार्गाने परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकू.

श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना! हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक 'क्षेत्रज्ञ' असे म्हणतात.हे अर्जुना! तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज. आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वत: जाणणे ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे.पाच महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध .

क्षेत्र म्हणजे शरीर. हे शरीर प्रकृतीकडून बनते. या शरीरात परमात्म्याचा, परम पुरुषाचा अंश जीव म्हणून आश्रय घेतो.

प्रकृती आणि पुरुष ही दोन्हीही सृष्टीची मूलतत्त्वे अनादि आहेत, आदिम आहेत. पुरुष अविकारी असतो. प्रकृती बदलत असली तरी ती नष्ट होत नाही. मूळ किंवा अव्यक्त प्रकृतीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण साम्यावस्थेत असतात. या साम्यावस्थेत विकार उत्पन्न झाले असता अव्यक्त प्रकृती व्यक्त होऊन सृष्टीची निर्मिती होते. तसेच शरीर प्रकृतीजन्य असल्याने ते प्रकृतीसारखे विकारशील असते. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या प्रभावाखाली मनुष्य कर्म करत असल्याने आहार, श्रद्धा, दान, तप, यज्ञ आदी सर्वांचे त्रिगुणांना अनुसरून सात्त्विक, राजसी आणि तामसी असे भेद होतात. पंचमहाभूते, इंद्रिये, इंद्रियांचे विषय, मन, बुद्धी आणि अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत.प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादि आहेत, असे तू समज आणि जसे महाकाश विभागरहित

असूनही घड्यांत वेगवेगळे असल्यासारखे भासते, तसाच परमात्मा सर्व भूतात एकरूप असूनही वेगवेगळा असल्यासारखा भासतो.

प्रकृती आणि पुरुष, म्हणजे चैतन्य याबद्दल पुढे भगवान सांगतात. चैतन्याला आदी नाही. प्रकृती आणि पुरुष दोघेही अनादी आणि अनंत आहेत. आपण जे पण बदल पाहतो ते प्रकृती मुळे होत असतात. पण परमात्म्याचे तत्व कधीच बदलत नाही.

कार्यकरणकर्तृत्वे, हेतुः प्रकृतिरुच्यते।
पुरुषः सुखदुःखानां, भोक्तृत्वे हेतुरुच्यते॥1 3 . 2 0 ॥

कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. अशाप्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्त्वत: जाणतात, ते महात्मे परम ब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मधला भेद कसे पाहता येईल? हा भेद ज्ञानचक्षु द्वारा पाहणे शक्य आहे. हा अध्याय आपली विवेकबुद्धी ( ज्ञानचक्षु) विकसित करण्यासाठी कार्य करतो. या अध्यायाचे वारंवार चिंतन केल्याने हळुहळु अज्ञानाचा पडदा दूर होईल आणि ज्ञानमार्गाने भगवंताची प्राप्ती होईल. क्षेत्र, क्षेत्रज्ञाचे अंतर पाहता येईल, प्रकृती म्हणजे काय? तिचे कार्य काय आहे? भूत कोण आहे? विश्वाची निर्मिती झाली का, झाली असेल तर विश्व काय आहे? जो सर्व काही बघतो, क्षेत्र क्षेत्रज्ञा बद्दल भावना जाणतो, तत्व जाणतो, त्याला परमात्मा प्राप्त होतो. आपण अशा भगवंता जवळ कधी पोहोचू याची काळजी करण्याची गरज नाही. तो आपल्यावर अतोनात प्रेम करतो.

सर्वतः पाणिपादं तत्, सर्वतोऽक्षिशिरोमुखम्।
सर्वतः श्रुतिमल्लोके, सर्वमावृत्य तिष्ठति॥1 3 . 1 3 ॥

ते सर्व बाजूंनी हात-पाय असलेले सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे. कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे.ज्या प्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सुक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

आकाश सर्वत्र आहे. आकाश म्हणजे अवकाश, रिकामी जागा. परमाणू मध्ये, शरीरा मध्ये आत आणि बाहेर सर्वत्र रिक्त जागा असते. आकाश सर्वत्र आहे पण ते लिप्त होत नाही.

अध्याय चौदावा : गीताव्रती मिनूजी झंवर यांनी अध्याय चौदावा गुणात्रयविभाग योग यावर सखोल चिंतन केले.अतिशय मोजक्या पारिभाषेत त्यांनी या अध्यायातील संकल्पना स्पष्ट केलंय. ब्रह्म सूत्रात वर्णन केलेल्या राजसी, तामसी आणि सात्विक गुणांचे विविध दाखले देऊन विवेचन केले.

श्रीभगवानुवाच

परं भूयः प्रवक्ष्यामि, ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्।
यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे, परां सिद्धिमितो गताः॥1 4 .1 ॥

श्रीभगवान म्हणतात ज्ञानांतीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने

सर्व मुनीजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. हे ज्ञान श्री भगवंतांनी अर्जुनाला दिले.

परंतु अर्जुनाच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून भगवंतांच्या हे निश्चित लक्षात येते की आपण देत असलेले ज्ञान अर्जुनाला फारसे समजले नाही.

भगवान म्हणतात हे अर्जुन! ज्ञानातील सर्वोत्तम परमज्ञान मी तुला अधिक विस्ताराने सांगतो. हे ज्ञान ऐकल्यावर,सर्व मुनिजन या संसार सागरातून मुक्त होतात आणि परमसिद्धीला पोहोचतात. त्यांचा उद्धार होतो.

संसारातील समस्त विविधता, पंचतत्त्वांच्याही वरची स्थिती, सूक्ष्म- स्थूल विविधतेचे एकमात्र कारण सत्त्व, रज, तम गुण हेच आहे. सर्व बाबतीत याच तीन गुणांमुळे विविधता आहे. हे अर्जुना! सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.

"अर्जुना, सत्त्व, रज, तम हे तीन गुणच, म्हणजे प्रकृतीच जीवात्म्याला या संसाराशी बांधून ठेवते."

चेतन आणि जड तत्त्वाचा संयोग कसा होतो कारण एक नित्य आणि दुसरे अनित्य, एक क्षय तर दुसरे अक्षय. यावर भगवंत म्हणतात आत्मतत्त्व तीन गुणांमुळे बंधनात अडकते.

तमस्त्वज्ञानजं विद्धि, मोहनं सर्वदेहिनाम्।
प्रमादालस्यनिद्राभि तन्निबध्नाति भारत॥1 4 . 8 ॥

हे अर्जुना! सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधतो.रजोगुण म्हणजे 'मी' आणि 'माझे' मानणारा. या गुणांनी युक्त असणारे लोक देहालाच 'मी' मानतात. तमोगुणामुळे अज्ञान निद्रा आणि आळस वाढीला लागतो. हे सगळे अज्ञानामुळे घडत असते.श्रेष्ठ (सात्विक) कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहेअर्जुन उवाच

कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः कथं चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥1 4 . 2 1 ॥

अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? आणि त्याचे आचरण कशाप्रकारचे असते? तसेच हे प्रभो! मनुष्य

कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही,

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख- दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात.जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यांत ज्याला 'मी करणारा' हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.

समदुःखसुखः स्वस्थः, समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:, तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥1 4 . 24 ॥

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख- दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात.

पंधराव्या अध्यायाचे विवेचन गुजराती भाषेत गीताव्रती देवलजी मेहता यांनी त्यांच्या रसाळ वाणीतून केले.

या अध्यायात आदिपुरुष परमेश्वराचे मूळ असलेल्या ब्रह्मदेवाला मुख्य फांदी संबोधले आहे.तसेच ज्या अश्वत्थवृक्षाला जो अविनाशी आहे त्याला संसाररूप म्हटले आहे. वेद ही या अविनाशी वृक्षाची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे.त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशु-पक्ष्याची योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्ययोनीत कर्मांनुसार बांधणारी अहंता-ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.या संसारवृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाली आढळत नाही. कारण याचा 'आदी' नाही, 'अन्त' नाही. तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंकार, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून टाकले आहेत.

ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. संसाराचे मूळ ईश्वर आहे आणि ईश्वर

सर्वोच्च आहे त्यामुळे विश्वाला उर्ध्वमूल म्हटले आहे. ईश्वरी संकल्पानुसार ब्रह्मदेव या संसाराचा विस्तार करणारा असल्याने तो त्या संसारवृक्षाची मुख्य शाखा ( खोड) आहे. म्हणून या संसारवृक्षाला 'अधःशाखा' असणारा वृक्ष म्हणतात.

मुख्य शाखारूप ब्रह्मदेवापासून सर्व लोकांसह देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनींची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे. म्हणून त्यांचे येथे फांद्यांच्या रूपात वर्णन केले आहे.

या वृक्षाच्या शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रगट होणारे व यज्ञादी कर्मांच्या द्वारा या संसारवृक्षाचे रक्षण व वृद्धी करणारे तसेच त्याची शोभा वाढविणारे वेद असल्यामुळे त्यांना 'पाने' म्हटले आहे.

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाचही विषय स्थूल देह आणि इंद्रिये यांहून सूक्ष्म असल्यामुळे त्यांना शाखांचे 'अंकुर' म्हटले आहे.

भगवंतांच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला हा संसार क्षणभंगुर, नाशवंत आणि दुःखरूप असल्यामुळे याचे चिंतन सोडून केवळ परमेश्वराचेच नित्य, निरंतर अनन्य प्रेमाने चिंतन करणे, हेच 'वेदांचे तात्पर्य जाणणे' होय.

अहंता, ममता आणि वासनारूप मुळे केवळ मनुष्ययोनीत कर्मांनुसार बांधणारी आहेत. असे म्हणण्याचे कारण हे आहे की, इतर सर्व योनीत केवळ पूर्वकृत कर्मांची फळे भोगण्याचाच अधिकार आहे आणि मनुष्ययोनीत नवीन कर्मे करण्याचाही अधिकार आहे.

संसारवृक्षाची परंपरा केव्हापासून चालत आली आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने याचा 'आदि' माहिती नाही, तर याची परंपरा पुढे किती काळ चालू राहील हे देखील माहित नसल्याने याचा 'अंत' ज्ञात नाही. हा वास्तवात क्षणभंगुर व नाशिवंत आहे म्हणून हा उत्तम प्रकारे स्थिरही नाही. त्यामुळे सर्व भोग क्षणिक व नाश पावणारे आहेत असे समजून या सांसारिक सर्व विषयभोगांमध्ये सत्ता, सुख, प्रीती आणि सौंदर्य न भासणेच 'बळकट वैराग्यरूप शस्त्र' आहे. स्थावर-जंगमरूप अखिल संसाराविषयीच्या चिंतनाच्या तसेच अनादी काळापासून अज्ञानाच्या द्वारा दृढ झालेली अहंता, ममता आणि वासनारूपी मुळांचा त्याग करूनच संसारवृक्षाच्या अवांतर मुळांसह मुक्त होता येते.

जे अभिमान आणि मोह यांच्यापासून मुक्त झाले, ज्यांनी आसक्तीरूपी दोषावर विजय मिळवला आहे, जे सतत ईश्वराच्या स्वरूपात मग्न आहेत, जे वासनांपासून मुक्त झाले आहेत, जे सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, अशा उच्च श्रेणीतील मानपानमोहविरहित साधकांना त्या अविनाशी परमपदाची प्राप्ती होते. आता भगवंत त्या परमपदाची माहिती देणार आहेत, आपला पत्ता सांगणार आहेत. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होउन चार प्रकारचे अन्न पचवितो.

भगवंतांनी प्रथम पृथ्वीमध्ये शिरून भूतमात्रांचे भरण पोषण ते कसे करतात हे सांगितले. आता हेच कार्य देहात त्यांच्या शक्तीने कसे होते हे, ते सांगतात. तीन प्रकारचे अग्नी असतात- वडवाग्नी, दावाग्नी आणि वैश्वानर किंवा जठराग्नी. जो प्रकट अग्नी आपण पाहतो तो दावाग्नी होय. समुद्रात जो अग्नी प्रज्वलित होतो त्याला वडवाग्नी म्हणतात. इथे वैश्वानर किंवा जठराग्नीविषयी सांगितले आहे. जठराग्नी हा पोटातील अग्नी आहे. हा भक्षण केलेल्या अन्नाचे पचन करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जरी सतत आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खाल्ले तरी त्यापासून तयार होणारे मलमूत्र गरमच असते, कारण पोटात त्या थंड पदार्थांवर जठराग्नीचे संस्कार झालेले असतात.

परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे. जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण-पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो.

भगवंत म्हणतात, “अर्जुना, नाशवंत प्रकृती आणि अविनाशी चैतन्य यांच्या पलीकडे असलेला जो उत्तम पुरुष तिन्ही लोकांना धारण करतो, त्यांचे भरण पोषण करतो, तो उत्तम पुरुष निराळाच आहे”.

महाकाश, मठाकाश, घटाकाश एकच आहे परंतु यांना सांभाळतो तो कोण? ईश्वराने आपली निर्मिती केली पण आपण त्याला निर्माण करू शकतो का? आपण परमात्म्याचे केवळ अंश आहोत. समुद्राचे सर्व गुण त्याच्या थेंबात असतात पण थेंब म्हणजे समुद्र असतो का? थेंब, थेंब मिळून समुद्र होत असला तरी थेंब म्हणजे काही समुद्र नाही.

परमात्माच अंशरूपाने जीवात्मा होतो. परमात्मा या संसाराला निर्माण करतो. आपण कुठे जन्माला येऊ? कुठे राहू? कधी आपला मृत्यू होईल? ते आपल्याला सांगता येत नाही. याची सर्व सूत्रे परमात्म्याच्या हातात असल्याने तो उत्तम पुरुष आहे. पुरुषोत्तम, पुरुष आणि प्रकृती या क्रमात पुरुष पुरुषोत्तमाच्या जवळ आहे. त्या पुरुषाचाच अंश जीवात्मा जो आपल्या देहात वसतो तो देखील पुरुषोत्तमाच्या जवळ आहे.

कारण मी नाशवान जडवर्ग-क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे.

. या अध्यायात उत्तम पुरुष असे आपल्या स्वरूपाचे वर्णन भगवंतांनी केले आहे म्हणूनच या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग असे आहे. भगवंत म्हणतात,

“नश्वर जीवात्मा आणि अविनाशी चेतनतत्त्व यांच्या भरणपोषणाचे काम करणारा मी एकमेव परमात्मा आहे. (परमात्मा जीवात्म्यापेक्षा उत्तम असल्याने तो पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे). पुरुषांमधील उत्तम असा मी पुरुषोत्तम आहे. अशा रीतीने मी तुला तुझे स्वरूप आणि माझे स्वरूप सांगितले आहे”.

इति गुह्यतमं शास्त्रम्, इदमुक्तं मयानघ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्, कृतकृत्यश्च भारत॥15.20॥

हे निष्पाप अर्जुना! असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे, याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

भगवंतांना अर्जुनाचे दोन गुण खूप आवडतात - एक अनघ (निष्पाप) आणि दुसरा अनसूय (कोणाचीही असूया न करणारा) . या अध्यायाचा समारोप करताना ते म्हणतात, “हे निष्पाप अर्जुना! अशा प्रकारे मी तुला हे अत्यंत महत्त्वाचे आणि रहस्यमय ज्ञान सांगितले आहे. हे जाणून घेतल्याने मनुष्य बुद्धीमान आणि कृतकृत्य होतो”.

गुह्यतम म्हणजे कोणालाच सांगता येणार नाही इतके गुप्त, इतकेच नव्हे तर ज्याला ते सांगायचे आहे त्याची तशी योग्यता असणे हे ही आवश्यक आहे. आपल्यालाही या गुह्यतम ज्ञानाचे श्रवण करता आले यावरून कोणत्यातरी जन्मातील पुण्याईमुळे, भगवंतांच्या कृपेने आपल्याला हे प्राप्त झाले आहे हे लक्षात येईल. अजून आपल्याला ऐकलेले ज्ञान आचरणात जरी आणता आले नसले तरी ऐकण्याची तरी निश्चितच पात्रता प्राप्त झाली आहे.

भगवंतांनी या अध्यायाला शास्त्र म्हटले आहे. मंगल, अमंगल सर्व प्रसंगी या अध्यायाचे पठण केले जाते. भगवंत म्हणतात, “हे शास्त्र जो जाणतो तो कृतार्थ होतो”.

भगवंतांनीच या अध्यायाला शास्त्र म्हटले आहे. म्हणून, जर पुरेशा वेळेअभावी एकच अध्याय वाचायचा असेल तर पंधरावा अध्याय वाचण्यासाठी सर्वात योग्य आहे कारण त्याला स्वतः भगवंतांनीच शास्त्राची मान्यता दिली आहे. या अध्यायाचे सार जाणून घेतल्याने मनुष्य बुद्धीमान आणि ज्ञानी बनतो आणि त्याचे जीवन फलदायी बनते.

या सत्राची सांगता

आभार प्रदर्शनाने झाली.गीताव्रती पुनीता प्रसाद जी

यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. सर्वात आधी त्यांनी गीता परिवाराचे वटवृक्ष ज्यांनी विस्तारित केले “ वसुदेव कुटुंबकम “ या उक्ती नुसार संपूर्ण विश्वात गीता परिवाराच्या फांद्या विस्तारित केल्या असे परम पूज्य स्वामी श्रीगोविंददेवगिरिजि महाराज यांना चरण स्पर्श केले. तसेच पुढे

पुज्यबस्वामीजी यांनी आ. संजय भैय्या,आ.आशू भैय्या आणि श्री.हरी नारायण जी व्यास यांना प्रेरित केले नी विश्वात गीता पोहोचवली. असा उल्लेख करून त्यांचे आभार व्यक्त केले. गीता सेवी निर्मलाजी मारू यांनी निस्वार्थ वृत्तीने सेवा दिली असा उल्लेख केला.कविता जी दीदी यां गीता परिवारात देत असलेल्या सेवे साठी त्यांचे ऋण व्यक्त केले.शेवटी सत्राचा दिप स्तंभ असलेली तांत्रिय सेवा टीम च्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यात श्री गोपाल दादा,दीपक दादा यांचा नामोल्लेख केला. समापन प्रार्थना मिनाजी द्विवेदी आझमगड उत्तर प्रदेश यांनी सादर केली. हनुमान चालीसा ने सत्र संपन्न झाले. चरण पादुका सेवा - 22 जनवरी 2024 - अयोध्या धाम बधाई हो! रामलला पुनः अयोध्या में विराजमान हुए.

मूल अंक के पृष्ठ देखें ९ पृष्ठ
मूल अंक, पृष्ठ ३९मूल अंक, पृष्ठ ४०मूल अंक, पृष्ठ ४१मूल अंक, पृष्ठ ४२मूल अंक, पृष्ठ ४३मूल अंक, पृष्ठ ४४मूल अंक, पृष्ठ ४५मूल अंक, पृष्ठ ४६मूल अंक, पृष्ठ ४७